नमस्कार,
               माझ्या वेबसाइटवर आपले सहर्ष स्वागत आहे. अंबड व घनसांगावी तालुक्यात शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी विविध सहकारी संस्थांची निर्मिती केली. यात प्रामुख्याने समर्थ साखर कारखाना , समर्थ दूध , मत्स्योदरी शिक्षण संस्था यांचा उल्लेख करता येईल.तसेच राज्य शासनाच्या विविध मंडळावर काम करण्याची संधी मिळाली. 2001 मध्ये पक्षाने माझा समावेश मंत्री मंडळात केला. जलसंधारण ,पर्यावरण , उद्योग ,नगरविकास ,सामान्य प्रशासन ,संसदीय कार्य, कमाल नागरिक जमीन धारणा या खात्याची जवाबदारी सांभाळली.2009 पासून उच्च ,तंत्र व वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद सांभाळत आहे. हे करताना आपल्या राज्यातील विद्यार्थी उच्च व तांत्रिक शिक्षणात इतर देशांच्या तुलनेत कोठेही कमी पडू नये या साठी अनेक चांगले निर्णय घेतले.माझ्या पक्षाच्या नेत्यांच्या व आपल्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले.या पुढील काळात असेच आशीर्वाद कायम राहतील अशी अशा व्यक्त करतो...............

राजेश टोपे !

    User Name :
   
    Password :